श्वास गझल, निश्वास गझल, जगण्याचा विश्वास गझल रसिक मित्रांनो, जगण्याचा हाच विश्वास जागवण्यासाठी ही वाटचाल मी करतो आहे गेली ४० वर्ष गझल गायकीतल्या या निरंतर प्रवासातली एक अत्यंत मोलाची उपलब्धी म्हणजे, मराठी गझलचे खलिफा कविवर्य सुरेश भट यांची लाभलेली सोबत आणि मार्गदर्शन शिवाय त्यांनीच बहाल केलेली "गझल नवाझ" ही उपाधी मित्रांनो, एक आंतरिक इच्छा होती खूप दिवसांची ती म्हणजे एक पूर्ण album केवळ भट साहेबांच्याच गझलांचा करावा ती इच्छा पूर्ण झाली आणि आज हे दुःखाचे तेजाब आपल्या सेवेत पेश करतोय पुन्हा तेजाब दुःखाचे उरी फेसाळुनी गेले पुन्हा ओठांवरी गाणे तुझे घोटाळुनी गेले