Kishore Kumar Hits

Salil Kulkarni - Aaj mi ayush mazhe текст песни

Исполнитель: Salil Kulkarni

альбом: Ja Dile Mann Tula


आज मी आयुष्य माझे चाचपाया लागलो
नेमके ते हरवले जे मी जपाया लागलो...
त्रस्त या जिन्यास झाला स्पर्श ओझरता तिचा
अन नाको म्हटले तरी मी जगाया लागलो. |2|
गीत माझ्या लेखणीचे इतुके भिनले तिला
ती लिहाया बैसली अन मी सुचाया लागलो...|3|
ठरवले हे पाहीजे, ते पाहीजे, ते ही हवे
मागण्या ताज्या तवान्या मी थकाया लागलो...|4|
शोधले माझेच पत्ते आत मी माझ्या किती
जग हरवलो तेव्हाच कोठे सापडाया लागलो...|5|
मज न आता थोडकी आशा कुणी की म्हणा
आज मी माझ्याच साठी गुणगुणाया लागलो...|6|
काय हे आयुष्य माझे, काय हे थट्टा तरी
मला सोडून मी सर्वा आवडाया लागलो... |7|
मी सुखाला पाळले बांधून दारी माझीया
ते सुखाने झोपले मी गस्त द्याया जागलो...|8|

Поcмотреть все песни артиста

Другие альбомы исполнителя

Похожие исполнители