फुलासारखा गं, चेहरा तुझा हा फुलासारखा गं, चेहरा तुझा हा मी पाहताना तुला कळली नव्याने मला प्रेमात पडण्याची नशा ह्या वाऱ्यावर पसरला माझ्या-तुझ्या स्वप्नांचा गंध गारवा ये चाखूया जरासा धुक्याच्या ओठांचा धुंद गोडवा हो, हलक्या-हलक्या सरींच्या थेंबानी चिंब होऊन जाऊ पुन्हा हो, ह्या वाऱ्यावर पसरला माझ्या-तुझ्या स्वप्नांचा गंध गारवा ♪ मनात फुलला हो, ऋतु सुगंधी हो बरसात व्हावी हो (बरसात व्हावी हो) जणू सुखाची हो रेशीम धागे असे विनावे मिठीत येता मोहून जावे, मोहून जावे झऱ्यासारखं गं हसणं तुझं हे झऱ्यासारखं गं हसणं तुझं हे मी भेटल्यावर तुला कळली नव्याने मला प्रेमात पडण्याची नशा ह्या वाऱ्यावर पसरला माझ्या-तुझ्या स्वप्नांचा गंध गारवा (गंध गारवा) ये चाखूया जरासा धुक्याच्या ओठांचा धुंद गोडवा हो-ओ, हलक्या-हलक्या सरींच्या थेंबानी चिंब होऊन जाऊ पुन्हा हो, ह्या वाऱ्यावर पसरला माझ्या-तुझ्या स्वप्नांचा गंध गारवा, गंध गारवा ♪ हलक्या-हलक्या सरींच्या थेंबानी चिंब होऊन जाऊ पुन्हा ह्या वाऱ्यावर पसरला माझ्या-तुझ्या स्वप्नांचा गंध गारवा (गंध गारवा)