संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा जगण्याला प्रेमाच्या तुझा सुगंध दिला देवा संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा जगण्याला प्रेमाच्या तुझा सुगंध दिला देवा फुलांफुलातून देतो संदेश आम्हाला देवा जगावे लोकांसाठी या देश तुझा हा देवा माणुसकीचा मंत्र दिला, प्रेमाचा पावन ग्रंथ दिला तू दिला आम्हाला तू फुलराजा, धन्य झालो देवा संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा जगण्याला प्रेमाच्या तुझा सुगंध दिला देवा ♪ जन्म लाभला आलो जगी, दिला फुलांचा झुला मार्गी मोक्षाच्या जरी निघालो, जात तुझी रे फुला या मातीला आकार दिला शिल्पकार तू खरा तुझ्या मुखी हे शब्द गवसले गीतकार तु खरा ऋणी तुझे आम्ही फुलराजा, धन्य झालो देवा संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा ♪ मन सुंदर-सुंदर जसा मोगरा, सदाफुलीचा साज नाचरा ही जाईजुई वाऱ्यांची डोले, रातराणी ताऱ्यांशी बोले शेवंतीने स्वप्न सजवुया, झेंडूसंग भक्तीत रमुया हे कमळासम निस्वार्थ बनुया, गुलपाक्षीचे पार्थ बनुया पारिजातचा संधी गाते, सोनचाफा बोली नाचे या भूमीवर देवांचा तारा अभिमानाने अवतरला सर्वधर्माचा तुच लाडका भेदभाव ना तुला हे ऋणी तुझे आम्ही फुलराजा, धन्य-धन्य देवा संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा जगण्याला प्रेमाच्या तुझा सुगंध दिला देवा फुलांफुलातून देतो संदेश आम्हाला देवा जगावे लोकांसाठी या देश तुझा हा देवा माणुसकीचा मंत्र दिला, प्रेमाचा पावन ग्रंथ दिला तू दिला आम्हाला तू फुलराजा, धन्य झालो देवा संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा जगण्याला प्रेमाच्या तुझा सुगंध दिला देवा हे, सुगंधानं तुझ्या, हे, धन्य झालो देवा