ही नजर तुझ्या नजरेला अवचित भिडली रे अन जादू झाली, भूल मनाला पडली रे ही नजर तुझ्या नजरेला अवचित भिडली रे अन जादू झाली, भूल मनाला पडली रे हा कसला भुलभुलैया? मी राधा, तूच कन्हैया हा कसला भुलभुलैया? मी राधा, तूच कन्हैया ही अवघड ज्वानी कशी आवरू सांग तूच मजला? इश्काच्या धुंदीत जीव झिंगला इश्काच्या धुंदीत जीव झिंगला इश्काच्या धुंदीत जीव झिंगला ♪ चांदण्याची रात तरी अंग-अंग चेतलं चांदण्याची रात तरी अंग-अंग चेतलं विझव तूच त्याला आता तुझ्यासाठी पेटलं विझव तूच त्याला आता तुझ्यासाठी पेटलं इश्काचा चावट भुंगा फिरफिरुनी डसतो अंगा इश्काचा चावट भुंगा फिरफिरुनी डसतो अंगा हा डंकास अन जीव पिसा, हा ध्यास खुळा कसला? हा, इश्काच्या धुंदीत जीव झिंगला इश्काच्या धुंदीत जीव झिंगला ♪ कशी तोल सावरू मी पाय थरथरती कशी तोल सावरू मी पाय थरथरती तुझी याद येता राया, ओठ हुळहुळती तुझी याद येता राया, ओठ हुळहुळती ही तुझी रांगडी बोली कानी का पिंगा घाली? ती तुझी रांगडी बोली कानी का पिंगा घाली? "विपरीत" म्हणू की, "प्रीत" म्हणू हा प्रश्न मला पडला इश्काच्या धुंदीत जीव झिंगला इश्काच्या धुंदीत जीव झिंगला इश्काच्या धुंदीत जीव झिंगला ही नजर तुझ्या नजरेला अवचित भिडली रे अन जादू झाली, भूल मनाला पडली रे हा कसला भुलभुलैया? मी राधा, तूच कन्हैया हा कसला भुलभुलैया? मी राधा, तूच कन्हैया ही अवघड ज्वानी कशी आवरू सांग तूच मजला? इश्काच्या धुंदीत जीव झिंगला इश्काच्या धुंदीत जीव झिंगला इश्काच्या धुंदीत जीव झिंगला