Kishore Kumar Hits

Shivanand Patil - Ghanashyam Sundara Shridhara текст песни

Исполнитель: Shivanand Patil

альбом: Sai Baba Mandir Ki Aartiyan, Pt. 1


घनश्याम सुंदरा...
घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला
उठी लवकरी वनमाळी, वनमाळी
उठी लवकरी वनमाळी उदयाचळी मित्र आला
घनश्याम सुंदरा...

अनंदकंदा प्रभात झाली
उठी सरली राती, उठी सरली राती
काढी धार क्षीरपात्र घेऊनी धेनू हंबरती
लक्षिताती वासुरे हरी धेनू स्तनपानाला
उठी लवकरी वनमाळी, वनमाळी
उठी लवकरी वनमाळी उदयाचळी मित्र आला
घनश्याम सुंदरा...
सायंकाळी एके मेळी द्विजगण अवघे वृक्षी
अरुणोदय होताच उडाले चरावया पक्षी
प्रभातकाळी उठुनी कावडी तीर्थ पथ लक्षी
करुनी सडा-संमार्जन गोपी कुंभ घेऊनी कुक्षी
यमुनाजळासी जासी मुकुंदा...
यमुनाजळासी जासी मुकुंदा दध्योदन भक्षी
घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला
उठी लवकरी वनमाळी, वनमाळी
उठी लवकरी वनमाळी उदयाचळी मित्र आला
(घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला)
(उठी लवकरी वनमाळी, वनमाळी)
(उठी लवकरी वनमाळी उदयाचळी मित्र आला)
(घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला)
(घनश्याम सुंदरा...)

Поcмотреть все песни артиста

Другие альбомы исполнителя

Похожие исполнители