बनवा बनवी, अशी ही बनवा बनवी
बनवा बनवी, अशी ही बनवा बनवी
बनवा बनवी, अशी ही बनवा बनवी
बनवा बनवी, अशी ही बनवा बनवी
साडी अशी नेसू, नि गालावरी हसू
जगा जसे हवे या तसे-तसे दिसू
भीती वाटे मला कि कुठेतरी फसू
जो डरे तो मरे या दुनियेची रीत अशी
बनवा बनवी, अशी ही बनवा बनवी
बनवा बनवी, अशी ही बनवा बनवी
♪
चंद्रमुखी दिसतेस अशी
तुझी-माझी ही जोडी गं किती-किती छान-छान
ये सजनी, जवळी सजूनी
तू किती गं नाजूक गोरी-गोरी-गोरीपान
चंद्रमुखी दिसतेस अशी
तुझी-माझी ही जोडी गं किती-किती छान-छान
ये सजनी, जवळी सजूनी
तू किती गं नाजूक गोरी-गोरी-गोरीपान
मी तर रंभा, उर्वशी, तू रे इस्पिक चा राजा
मी तर रंभा, उर्वशी, तू रे इस्पिक चा राजा
ओ, असल्या शृंगारानं तू आमचा वाजविला बाजा
मी तर रंभा, उर्वशी, तू रे इस्पिक चा राजा
याची टोपी त्याला, नि त्याची टोपी याला
कळे ना हे ज्याला तो पुरता बुडाला
लोक भुलताती या वरल्या रंगला
जो खोटं करी खरं त्याला दुनिया सलाम करी
बनवा बनवी, अशी ही बनवा बनवी
बनवा बनवी, अशी ही बनवा बनवी
♪
तू नवरी कशी गं जबरी
राजी खुशीनं, गोडीनं माझ जरा मान-मान
मी नवरा दिसतो भवरा
तुझ्या कुंकवाचा ठेव बाई थोडं तरी भान-भान
तू नवरी कशी गं जबरी
राजी खुशीनं, गोडीनं माझ जरा मान-मान
मी नवरा दिसतो भवरा
तुझ्या कुंकवाचा ठेव बाई थोडं तरी भान-भान
नको रे रागानं बोलू मनमोहना
राधा प्रीतीची मी बावरी, होय, बावरी
चल रे आनंदी संसार मांडूया
नवरी लाडाची मी, नवरी लाडाची मी
नवरी लाडाची मी लाजरी, हाय, लाजरी
Hey, नाचू, खेळू, गाऊ, नि मजे मध्ये राहू
उन्हाळा, हिवाळा हो आम्ही सारे साहू
जिथं-जिथं जाऊ, तिथं चलाखी ही दावू
सुखासाठी जगामध्ये इथे-तिथे चाले अशी
बनवा बनवी, अशी ही बनवा बनवी
बनवा बनवी, अशी ही बनवा बनवी
साडी अशी नेसू, नि गालावरी हसू
जगा जसे हवे या तसे-तसे दिसू
भीती वाटे मला कि कुठेतरी फसू
जो डरे तो मरे या दुनियेची रीत अशी
बनवा बनवी, अशी ही बनवा बनवी
बनवा बनवी, अशी ही बनवा बनवी
Поcмотреть все песни артиста